जयसिंगपूर-दि.26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती एस.एम.जी. प्रतिष्ठान संचलित बोधिसत्व युवा विचारमंच गोठणेगाव वसाहत,दानोळी ता.शिरोळ या ठिकाणी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहारात साजरी करण्यात आली..जयंती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा परिषद येथील आशा वर्कर्स प्रकल्प अधिकारी व मराठा समाजाचे कार्यकर्ते सतीश लव्हटे हे होते.तर अध्यक्षस्थानी शाहीर दिपकभाई गोठणेकर होते.
छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बुद्ध विहारात साजरी
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय पाटील यांचेकडून
राजर्षी शाहू महाराजांचा कृतिशील वैचारिक वारसा चालविण्याच्या हेतूने
मदत म्हणून दिलेल्या रक्कमेतून बौद्ध समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा
शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करणेत आला..
यावेळी शाहीर गोठणेकर यांनी छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेमधील जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध,
शाहू राजेंनी बाबासाहेबांना केलेली शैक्षणिक मदत,शाहू राजेंचे आपले संस्थानातील
दलित,मुस्लिम स्त्रियांविषयक आरक्षण व समतावादी धोरण,शिवाय शाहू राजेंची एकूण विकासात्मक दूरदृष्टी यावर आपले भाषणातून प्रकाश टाकला.
मराठा व बौद्ध हे दोघे भाऊ एकत्र येणे व सामाजिक सलोख्याने राहणे गरजेचे
सतीश लव्हटे यांनी मराठा व बौद्ध हे दोघे भाऊ असून आजच्या जातीय विद्वेष पसरविणा-या राजकीय परिस्थितीत दोघांनी एकत्र येणे व सामाजिक सलोख्याने राहणे गरजेचे असलेचे मत व्यक्त केले.संख्येने मराठा तुलनात्मक जास्त असला तरी वैचारिक व सामाजिक प्रगल्भ हा बौद्ध असलेने त्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घ्यावा,असे ते म्हणाले..
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक दाऊद पटेल,प्रकल्पग्रस्त बौद्ध संघर्ष समितीचे सुनील कांबळे,जेष्ठ कार्यकर्ते अशोक कांबळे,काशीनाथ कांबळे यासह समाजातील महिला पुरुष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमाचे स्वागत बोधिसत्व विचारमंचचे अध्यक्ष विजय गोठणेकर यांनी केले,प्रास्ताविक उपाध्यक्ष रणधीर कांबळे यांनी केले,सूत्रसंचालन व आभार अजय कांबळे यांनी मानले.तर कार्यक्रमाचे संयोजन सचिव विनोद कांबळे,संजय कांबळे,प्रकाश कांबळे, सचिन कांबळे,संदेश कांबळे,प्रशिक कांबळे,सम्यक गोठणेकर आदींनी केले.
चंद्रशेखर ला भेटण्यासाठी बजरंग पुनिया, साक्षी मलिक ने बांधला काळा धागा
CCTV footage भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद वर प्राणघातक हल्ला, गोळीबार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 30 JUN 2023, 15:58 PM
WebTitle – Chhatrapati Shahu Maharaj’s birth anniversary is celebrated at Buddha Vihara kolhapur