आता राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ या शब्दावरून बिहारच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. जेडीयूचे माजी प्रवक्ते अजय आलोक यांनी घटनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली. यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पावसाळी अधिवेशनात अजय आलोक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे घटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द हटविण्याची मागणी केली. तो हटविण्याची मागणी विरोधकांच्या उपस्थितीत करण्यात आली. अजय आलोक यांनी धर्मनिरपेक्ष हा शब्द कलंक असल्याचे म्हटले आहे.
जेडीयूच्या माजी प्रवक्त्याचे ट्विट
अजय आलोकने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आणि त्या ट्विटमध्ये पीएमओ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना टॅग केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, संविधानात ‘सेक्युलर’ हा शब्द विरोधकांच्या अनुपस्थितीत जोडण्यात आला होता, पण त्यांच्या उपस्थितीत तो काढून टाकावा. हा शब्द हटवण्यास कोणाचा विरोध आहे हे साऱ्या देशाला बघायचे आहे. अशा लोकांनी समोर यायला हवं.
देशात कुणी ‘सेक्युलर’ नाही : अजय आलोक
या देशात कुणीही ‘सेक्युलर’ नाही, असेही अजय आलोक म्हणाले; सर्वांची आपापल्या धर्मावर श्रद्धा असून ते पूजा, उपासना, प्रार्थना करतात. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली इतर धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जावे, अशी कट्टरतावाद्यांची इच्छा आहे. यामध्ये पहिले टार्गेट हिंदू आहेत; जे इतर धर्माचा आदर करतात.सांभाळा सगळे लोक.
घटनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकण्याची मागणी होत आहे
अजय आलोक यांनी घटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द नंतर जोडला गेल्याची परिस्थिती सांगितली आहे. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना तयार करताना त्यात ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दाचा उल्लेख नव्हता.आणीबाणीच्या काळात 1976 मध्ये प्रस्तावनेत सुधारणा करण्यात आली, ज्यामध्ये ‘सेक्युलर’ शब्दाचा समावेश करण्यात आला. मात्र विरोधक उपस्थित नसताना संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. विरोधकांच्या अनुपस्थितीत तत्कालीन सरकारने ते घटनेत समाविष्ट केले होते. ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घटनेत नंतर जोडण्यात आला असा आरोप करत तो हटवण्याची मागणी विविध क्षेत्रांतून अनेकदा झाली.
भाजप प्रवक्त्यांची प्रतिक्रिया
भाजपचे प्रवक्ते प्रेम रंजन पटेल यांनी माजी जेडी(यू) नेत्याच्या मागणीवर म्हंटलं की, तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घटनेत जोडला गेला आहे आणि तो लवकरात लवकर काढून टाकला पाहिजे; हे देशाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी आहे. मात्र; भाजपचा मित्रपक्ष जेडीयूचे या प्रकरणी थोडे वेगळे मत आहे.
जेडीयूला आक्षेप
संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकण्यावर जेडीयूचा आक्षेप आहे.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार यांनी या प्रकरणी निवेदन देताना सांगितले की,
संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरण्यात आलेला असताना तो काढून टाकण्याचे कोणतेही औचित्य नाही.
आम्ही सावरकरांची अवलाद नाही,जेल जाण्यास घाबरत नाही-केजरीवाल
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 23, 2022, 21:24 PM
WebTitle – jdu-ajay-alok-leaders-demand-to-delete-the-word-secular-from-the-constitution