मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र पोलिसांकडून सध्या महाराष्ट्र दर्शन घडवलं जात असल्याची खोचक टीका राजकीय वर्तुळात सुरू आहे.त्यांच्यावर राज्यातील ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एमएसआरटीसीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी बुधवारी येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.दरम्यान,त्यांची वकिली सनद रद्द करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मिडिया काम पाहणारे नितीन यादव यांनी महाराष्ट्र व गोवा बार काउंसिलकडे तक्रार दाखल केली आहे.
काय नेमकी तक्रार आहे?
आपल्या वकीली सनदेचा गैरवापर करत देशाचे जेष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या घरावर हल्याचा कट रचल्याबद्दल व प्रक्षोभक वक्तव्यांने सामाजिक शांतता बिघडवल्याबद्दल ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची वकीली सनद तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र व गोवा बार काउंसिलकडे करण्यात आलीय,अशी माहिती नितीन यादव यांनी सोशल मिडियात तक्रार अर्ज शेअर करून दिली आहे.
आरोपांच्या बाबत गुणरत्न सदावर्ते यांचे म्हणने
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, ते घटनास्थळी हजर नव्हते
आणि त्यामुळे त्यांच्यावर ज्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते कलम त्यांना लागू होत नाहीत.
सदावर्ते यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
यापूर्वी अधिवक्ता सदावर्ते यांनी जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते, त्यांनी गिरगाव न्यायालयात याचिका दाखल केली होती. जी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (गिरगाव न्यायालय) जयवंत चंद्रकांत यादव यांनी फेटाळली होती.
सातारा न्यायालयाने दिलासा दिला
एड.गुणरत्न सदावर्ते यांना सातारा सत्र न्यायालयाने दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला. छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा पोलिसांकडे सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यामुळं पोलिसांनी त्यांना अटक केली होती.त्यातून आता त्यांना जामीन मिळाला आहे.मात्र कोल्हापूर, सातारा, अकोला अशा विविध ठिकाणी त्यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्यामुळे चौकशीसाठी त्यांची पोलीस कस्टडी मागण्यात येत आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
Amy Wax या युएस प्राध्यापिकेचं ब्राह्मण स्त्री विषयी वादग्रस्त वक्तव्य
राज ठाकरे यांना आता नीलेश कराळे मास्तर यांचे प्रत्युत्तर..म्हणाले
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 20, 2022 20:42 PM
WebTitle – Gunaratna Sadavarte’s demand for revocation of Advocate Charter