बौद्ध धम्मात अशोक स्तंभ एक महत्वाचं प्रतिक मानलं जातं,सम्राट अशोक यांनी इ.स.पूर्व २५० च्या सुमारास चतुर्मुख सिंह असणाऱ्या स्तंभांची निर्मिती केली होती.असे अनेक स्तंभ सम्राट अशोक यांनी भारतीय उपखंडात पसरलेल्या आपल्या साम्राज्यात अनेक ठिकाणी उभारले होते.पुढे शेकडो वर्षांनंतर आलेल्या इंग्रजांनी भारतभर राज्य केलं.त्यानंतर इंग्रजांच्या राजवटीतून भारत स्वतंत्र झाला.भारतात लोकशाही स्वीकारली गेली,त्यावेळी भारताचं राष्ट्रीय चिन्ह म्हणून अशोक स्तंभ स्वीकारला गेला.अशोक स्तंभ भारतभर उभारले जात आहेत,असाच एक अशोक स्तंभ नांदेड येथे उभारला गेला असून तो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
नांदेड येथील अशोक स्तंभ किती उंची आहे?
नांदेड येथील अर्धापुर तालुक्यातील दाभड येथे दरवर्षी धम्म परिषद भरत असते.
याच परिसरातील बावरीनगर येथे तब्बल 65 फुट उंच अन 15 फुट रुंद असणारा हा स्तंभ उभारण्यात आला आहे.
येथील अशोक स्तंभ हा भारतातील सर्वात उंच अशोक स्तंभ असल्याचे काही लोकांचे म्हणने आहे.सदर अशोक स्तंभाची निर्मिती महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झाल्याची माहिती मिळत असून अशोक स्तंभ निर्मिती ही साल २०१२ पासून म्हणजे गेली दहा वर्षे सुरू होती अशीही माहिती समोर आली आहे.
नांदेड येथील अशोक स्तंभ हा उत्तर प्रदेशमधिल सांची येथून आणलेल्या लाल रंगाच्या संगमरवरी दगडातून उभारण्यात आला असून अशोक स्तंभ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
अशोक स्तंभ:शोधलेल्या इंग्रजाने घराला ‘सारनाथ’ नाव दिलं, ते राष्ट्रीय चिन्ह कसे बनले?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 08,2023 16:40 PM
WebTitle – 65 feet tall Ashoka pillar at Nanded