जात नाही ती जात असं काहीजण हतबलतेने म्हणतात,परंतु ते तितकेसे खरे नाही,जात नक्की जाते. आपली तयारी असली की अशक्य गोष्टीही शक्य होतात.भारतात जात वास्तव हे फारच टोकदार आणि जहाल आहे.जातीवरून भांडणे आणि हत्या या नव्या नाहीत. आंतरजातीय विवाहात अनेकदा आपण टोकाचा संघर्ष पाहत आलो आहोत.यातून अनेकांचा जीव सुद्धा गेला आहे.अशा टोकाच्या हिंसक पार्श्वभूमीवर समाजातील काही भागात मात्र आंतरजातीय विवाह हे दोन कुटुंबीयांसाठी आनंद सोहळा ठरले. बौद्ध आणि मराठा दोन्ही कुटुंबीयांना आनंद साजरा करत एकत्रित आणून एका नव्या नात्याला सुरुवात करताना पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला.या नवपरणीत दाम्पत्यास पुढील वाटचालीस मंगल शुभेच्छा देवून कौतुक केले आहे.महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असं का म्हणलं जातं याचं हे एक ठळक उदाहरण.
समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी (रोटी बेटी व्यवहार) आंतरजातीय विवाह होणे आवश्यक आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ही गोष्ट आहे पेण जिल्हा रायगड येथील हर्षाली आणि जितेश ची.दोघेही सुशिक्षित उच्चशिक्षित, हर्षली नोकरी करते तर जितेश व्यावसायिक आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम,त्यांनी ते घरी कुटुंबीयांना कळवलं.घरून विरोध होईल असं वाटलं परंतु दोन्ही घरातून मुलांच्या पसंतीला संमती मिळाली.आणि दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

लग्नाच्या बोलणीसाठी दोन्ही कुटुंब एकत्र आली आणि लग्नाचा ठराव यशस्वी झाला,दोन्हीकडच्या पाच पाच व्यक्तीनी यात सहभाग घेतला.तुमची पद्धत आमची पद्धत आणि त्यातून काढलेला मध्यममार्ग यामुळे ही दोन्ही बौद्ध आणि मराठा कुटुंबे एका आदर्श विचारांनी आणि मनांनी एकत्र आली.

दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईक आप्तेष्ठ मित्र मंडळी गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा आनंददायी सोहळा पार पाडला.
हा सोहळा उर्वरित समाजासाठी एक चांगला आदर्श असून यामुळे अशा विवाहास समाजात असणाऱ्या जातीयभेदास
समूळ नष्ट करण्याचे एक साधन म्हणून पाहता येवू शकते.

उच्च शिक्षित तरुणांनी यासाठी असा पुढाकार घेणे गरजेचे आहे,आपले शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहून तरुणांनी असे आदर्श उदाहरण दाखवून समाजाला योग्य वाटेवर आणणे ही जबाबदारी तरुणांची आहेच तसेच दोन्ही कुटुंब आणि उर्वरित समाजाची सुद्धा आहे.एक पाऊल समतेच्या दिशेने टाकणे जबाबदारी सर्वांची आहे.

अशा बातम्याना खरेतर मेनस्ट्रिम माध्यमात प्रसिद्धी मिळणे गरजेचे असते.
निकोप आदर्श समाज घडविण्यासाठी अशा घटना एक आदर्श म्हणून समोर असतात,
मात्र प्रस्थापित माध्यमे अशा गोष्टींकडे कायम कानाडोळा करताना दिसतात.
आणि म्हणून जागल्या भारतची निर्मिती आणि आवश्यकता इथे नितांत भासते.
प्रस्थापित माध्यमांना असा पर्याय उपलब्ध असणे समाजासाठी गरजेचे आहे.
टीम जागल्या भारत कडून या नवपरिणीत दाम्पत्यास हार्दिक शुभेच्छा मंगल हो
शाहीर सीमाताई पाटील यांनी स्वीकारला बौद्ध धम्म
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on March 01 , 2021 11:50 AM
WebTitle – buddhist Maratha bride groom wedding ceremony
The greatest couple, parents and people.The best example for the society.
हे जातीअंता कडे जाणारे महत्वाचे पाऊल आहे. भारताला जातीमुक्त करण्यासाठी प्रत्येक युवा युवती नी दखल घ्यावी अशी घटना आहे. हार्दिक अभिनंदन शुभेच्छा.