मुंबई : मुंबईतील चर्चगेट मधिल सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात मोना मेश्राम या तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.मोना मेश्राम या अकोला येथून शिक्षणासाठी मुंबईला आल्या होत्या.पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात त्या शिक्षण घेत होत्या.वडील सकाळपासून फोन करत होते,मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी मैत्रिणीला फोन करून विचारलं.शोध घेतल्यानंतर दरवाजा बाहेरून लॉक असल्याचे दिसून आले.तसेच वसतिगृहाचा सुरक्षारक्षक देखील गायब असल्याचे लक्षात आले.त्यामुळे त्याच्यावर संशय घेतला जाऊ लागला.पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता. तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला.
वॉर्डनची सुद्धा चौकशी झाली पाहिजे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह येथे झालेल्या प्रकरणा संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांनी पीडित कुटुंबीयांची आज दुपारी २ वाजता भेट घेतली,त्यानंतर ते पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला की वॉर्डन ने मुलीला आणि तिच्यासोबत आणखी दोघींनी वेगळं ठेवलं होतं.त्यांच्या परीक्षा संपल्यानंतर त्या घरी गेल्या होत्या,चौथ्या मजल्यावर केवळ एकच मुलगी मोना मेश्राम या राहिल्या होत्या.शेवटचा पेपर असल्याने मोना थांबल्या होत्या,त्याचदिवशी त्यांच्यावर अतिप्रसंग करून नंतर गळा दाबून हत्या करण्यात आली.कुटुंबांच म्हणणं आहे की वॉर्डनची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.तसेच दहा वर्षापूर्वी या वॉर्डन अशाच वादात सापडल्या होत्या अशी गंभीर अन धक्कादायक माहिती यावेळी त्यांनी बोलताना दिली.
वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकानेच मोना मेश्राम यांची हत्या केल्याचा आरोप केला जात असून यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान संध्याकाळी 6 च्या सुमारास या सुरक्षारक्षकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला.त्याने चर्नी रोड ते ग्रँट रोड या स्थानकांच्यादरम्यान रेल्वेखाली जीव दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.अपघातात त्याच्या शरीराचे दोन भाग झाल्याची माहिती समोर आलीय.तसेच पंचनामा केला असता मोना मेश्राम यांच्या रूमला लावलेल्या लॉक ची चावी त्याच्या खिशात सापडून आली आहे.
धोबी ला बनवले सुरक्षा रक्षक
भारतीय जनता पार्टी च्या नेत्या चित्रा वाघ यांनी सदर वसतिगृहाला भेट दिली,त्यावेळी त्यांनी म्हटलं की,चर्चगेटच्या सावित्रीबाई वस्तीगृहात अकोल्याहून शिक्षणासाठी आलेल्या मुलीवर तिथे धोबीकाम व वॅाचमनचं काम करणाऱ्या नराधमानेच बलात्कार करून तिचा खूनही केलाय नंतर त्यानं स्वतःलाही संपवलय
मी आताच घटनास्थळी भेट दिलीये पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत चौकशीही सुरू केलीय
या घटनेमुळे वसतीगृहातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे…
मुळात यातून काही प्रश्न निर्माण होत आहेत…
- जो धोब्याचं काम करत होता त्याला वॅाचमन म्हणून का नेमण्यात आलं…?
- कुणाच्या सांगण्यावरून ही नियुक्ती केली.
शिवाय या प्रकरणात हॉस्टेलच्या अधिष्ठाता व तिथला स्टाफ यांची सुद्धा कसून चौकशी सुरू आहे
तिथे असणाऱ्या इतर विद्यार्थींनी सोबत ही चौकशी सुरू आहे
या घटनेवर राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री आणि मा.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री लक्ष ठेवून आहेत..
शासनाचा हलगर्जीपणा
हा सुरक्षारक्षक गेल्या 15 वर्षापासून तिथं काम करत असल्याची माहिती मिळते.घटनेच्या दिवशी सकाळी तीन वाजता तो चौथ्या मजल्यावर गेल्याचं सिसिटीव्ही मध्ये दिसून आलं आहे. तसेच त्यानंतर तासाभरानेच तो वसतिगृहाच्या इमारतीमधून बाहेर पडत असल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे वसतिगृहतील काही सिसिटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याची गंभीर बाब समोर आलीय,विशेष म्हणजे याबाबत तक्रार देऊनही हे सिसिटीव्ही कॅमेरे दुरुस्त केले गेले नव्हते,यावरून सरकारी प्रशासकीय पातळीवर असणारा टोकाचा हलगर्जीपणा यातून स्पष्ट दिसून येतो आहे.यासोबच मुंबईतील समाजकल्याण खात्याचे जबाबदार अधिकारी यानीही या वसतिगृहाला अद्यापपर्यंत भेट दिलेली नाही,हा त्यांचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप एड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
बौद्ध जिल्हाधिकारी मनीष नारनवरे यांना जातीयवादातून वरिष्ठांकडून त्रास
सरस्वती वैद्य;खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
पुन्हा फ्रीज हत्याकांड; स्टोनकटरने केले तुकडे,श्रद्धा वालकर हत्याकांडसारखी घटना
पत्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 08, JUN 2023, 20:40 PM
WebTitle – Latest update on Mona Meshram murder in Savitribai Phule hostel