संसदेच्या विशेष अधिवेशनात (Special Session) मोदी सरकार मोठी घोषणा करू शकते. CNN-News18 ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान आपल्या देशाचे इंडिया हे नाव बदलून भारत असा नवा प्रस्ताव आणू शकते.राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी G20 डिनरसाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात इंडिया च्या राष्ट्रपतीऐवजी राष्ट्रपती भारत (President of Bharat) असे लिहिले होते. यावर काँग्रेसने मंगळवारी सरकारवर जोरदार प्रहार करत आता ‘राज्य संघराज्य’वरही हल्लाबोल केला जात आहे.यावर काँग्रेसने मंगळवारी सरकारवर जोरदार प्रहार करत आता ‘राज्य संघराज्य’वरही हल्लाबोल केला जात आहे.
ही बातमी खरी आहे
X वरील (ट्विटरवरील) एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “ही बातमी खरी आहे. राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 डिनरसाठी नेहमीच्या ‘इंडिया च्या राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताच्या राष्ट्रपती’च्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत.
काँग्रेस मीडिया सेलचे प्रभारी म्हणाले, “आता राज्यघटनेतील कलम 1 खालीलप्रमाणे वाचले जाईल: भारत, जो इंडिया होता, तो आता राज्यांचा संघ असेल.” परंतु आता या ‘राज्य संघ” वर देखील हल्ला होत आहे.
इंडिया नाव बदलून भारत करण्याच्या प्रस्तावासंबंधीची तयारी सुरू आहे
CNN-News18 च्या वृत्तानुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार “इंडिया” हा शब्द काढून टाकण्याचा विचार करत आहे. घटनेची माहिती असलेल्या सूत्रांनी दावा केला की या प्रस्तावासंबंधीची तयारी सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या ‘अमृत काल’ दरम्यान सरकार देशातील जनतेला ‘गुलामगिरीची मानसिकता’ आणि अशा मानसिकतेशी संबंधित कोणत्याही कृतीविरुद्ध प्रबोधन करेल.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी विरोधी आघाडीवरही निशाणा साधला.
राज्यसभेत त्यांच्या एका विधानादरम्यान गोंधळ निर्माण करणे आणि सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणे यावर ते म्हणाले की विरोधी सदस्य ‘इंडिया ‘ (विरोधी आघाडीचे नाव) असल्याचा दावा करतात, परंतु ते भारताचे राष्ट्रीय हित ऐकण्याच्या तयारीत नसतील तर ते कोणत्या प्रकारचे इंडिया आहेत?
‘लोकांनी इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरण्याची सवय लावावी’- आरएसएस प्रमुख मोहन भागवत
अलिकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख संघ चालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात
लोकांना इंडिया ऐवजी भारत हे नाव वापरण्याचे आवाहन केले होते.
ते म्हणाले, शतकानुशतके या देशाचे नाव भारत आहे, इंडिया नाही. त्यामुळे देशाचे जुने नावच वापरावे.
भारतात राहणारा प्रत्येक माणूस ‘हिंदू’ आहे.
यापूर्वी त्यांनी शुक्रवारी (1 सप्टेंबर 2023) सांगितले की भारत एक ‘हिंदू राष्ट्र’ आहे
आणि सर्व भारतीय हिंदू आहेत आणि सर्व भारतीय हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व करतात. असं म्हटलं होतं.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 05,2023 | 13:12 PM
WebTitle – India name will be changed BJP’s new political game in the name of bharat