पिंपरी चिंचवड – जयश्री राजेंद्र वाघमारे राहणार काळेवाडी पुणे यांचा गेल्या सहा महिन्यांपासून तीच्या सासरी राहत होती. परंतु गेल्या सहा महिन्यापासून घरातील सर्व मंडळी तू खालच्या जातीची आहेस म्हणून तिचा सतत छळ करीत होते. व अनेकदा तिला घरातून बाहेर हाकलून देत होते. अशाच अनेक वेळा त्यांनी राजश्रीचा मारहाण करून छळ केला होता. त्यानंतर दिनांक 31 मार्च 2023 रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान घरातील सासू सासरे दीर व पती यांनी मिळून जयश्रीचा गळा दाबून खून करण्यात आला होता.याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने पाठपुरावा करत आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री वाघमारे यांचे मारेकरी असणाऱ्या सासू-सासरे दिर, पती मृत्यूस जबाबदार असणाऱ्या नराधमांना त्वरित अटक करून आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर व पीडित कुटुंबीयांच्या केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पोलीस प्रशासनाने पुर्ण सहकार्य करत आणि या घटनेस तितक्याच गांभीर्याने दखल घेऊन,
जयश्री वाघमारे यांच्या मारेकऱ्याना वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने
व पिडीत कुटुंबाच्या मागणीनुसार कलम ३०२ व ॲट्रासिटी अंतर्गत येणारी सर्व कलम वाढ करण्यात आली आहे.
या प्रकरणात वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष चंद्रकांत लोंढे
व पिंपरी-चिंचवडमधील सकल मातंग समाज व पिडीत कुटुंबाच्या वतीने पोलीस प्रशासनास केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.
पुन्हा फ्रीज हत्याकांड; स्टोनकटरने केले तुकडे,श्रद्धा वालकर हत्याकांडसारखी घटना
संसद उद्घाटन वाद;मायावती यांचा विरोधकांपेक्षा वेगळा सूर
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 26, MAY 2023, 17:02 PM
WebTitle – culprit booked under the Atrocities Act in Jayashree Waghmare death