दैनिक वृत्तरत्न सम्राट चे संपादक बबन कांबळे यांचे आज बुधवार दिनांक ०८/०२/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. दीर्घ आजारामुळे लाईफ लाईन हाॅस्पिटल, ठाणे येथे निधन झालं आहे, त्यांचे अंतिम दर्शन, रुस्तुमजी टावर, माजिवाडा, ठाणे येथे होईल.
वृत्तरत्न सम्राट ने एकेकाळी महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला होता,दैनिक वृत्तरत्न सम्राट मध्ये आलेल्या बातमीमुळे
शासन प्रशासन पातळीवर हादरे बसत असायचे,दैनिक वृत्तरत्न सम्राट मधिल लेख समाजामन ढवळून काढायचे.
दैनिक वृत्तरत्न सम्राट हे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीला एक हक्काचं माध्यम निर्माण झालं होतं.
वृत्तपत्र विक्रेत्याकडून दैनिक वृत्तरत्न सम्राट मिळवून वाचण्याची लोकांमध्ये क्रेझ होती,असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. तशा काही घटना सुद्धा त्यावेळी घडल्याचे वाचायला मिळत असे.सम्राट मध्ये आलेली बातमी महाराष्ट्रातील ग्रामीण अन शहरी दोन्ही भागात सर्वदूर पोहोचत असायची.महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळतील अनेक नामवंत विचारवंत लेखक यांनी दैनिक सम्राट च्या माध्यमातून आपले विचार मांडले.अनेक लेखमाला चालविल्या होत्या.त्याकाळातील तरुणाना एक वैचारिक खाद्य पुरविण्याचे काम दैनिक वृत्तरत्न सम्राट ने केलेलं आहे.
चळवळीचे हे वृत्तपत्र चालावं म्हणून समाजातील अनेक गोरगरीब लोकानी त्याकाळी आपल्या गाठीला असणारा पैसा अडका दागदागिने सुद्धा सम्राटच्या गौरवपर कार्यक्रमात दिलेले होते.त्यामुळे लोकाना सम्राट प्रती कोणत्याप्रकारची भावना होती,हे यातून स्पष्ट होते.
दैनिक सम्राट ची क्रेज भयंकर होती,पेपर स्टॉलवर सम्राट पेपर असताना वृत्तपत्र विक्रेते तो पेपर सर्वात खाली ठेवत,
लोकांच्या दृष्टीस पडणार नाही असा ठेवत, रेल्वेचे स्टॉल असतील किंवा इतर ठिकाणचे हे मी स्वत: पाहिलं अनुभवलं आहे.
त्यावेळी आजच्या सारखं डिजिटल जग नव्हतं.मोबाइल नव्हते.त्यामुळे टीव्ही नंतर प्रिंट मध्ये वृत्तपत्र हेच एक माध्यम होतं.
त्यात सम्राट मधून येणारे लेख लोकाना पसंत पडत असत,चळवळीच्या बातम्या सम्राट मधून येत होत्या.
माझा एक रवी नावाचा मित्र.तो धनगर समाजाचा, त्याने सम्राट पेपर सुरू केला,मला एकदा भेटीत म्हणाला
“हाच पेपर आपल्या बातम्या देतो,बहुजनांनी सम्राट विकत घेतला पाहिजे,”
त्यावेळी महादेव जानकर राजकारणात लोकप्रिय होत होते,त्यांच्या बातम्या सम्राट देत होता.लेखही छापले जात होते.
बहुजन समाजात सम्राट लोकप्रिय झाला होता,एवढा की एकवेळ तर लोक त्यासाठी मारहाण करत. पेपर असूनही नाही,संपला असं बोलणाऱ्या दडवून ठेवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याना मारहाण झाल्याच्या बातम्याही त्यावेळी येत राहिल्या.
आमचे वडील गेले तेव्हा मी त्यांच्या निधनाची बातमी दैनिक सम्राट मध्ये दिली होती,त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले,मला भेटले,त्यांच्या गावांची नावं मी त्यावेळी पहिल्यांदा ऐकली होती,त्यावेळची गर्दी सुद्धा मला मी काय गमावलं याची जाणीव करून देणारी होती,त्यात एक निळी टोपी असणारे जेष्ठ कार्यकर्ते नागपूर च्या कोणत्या तरी गावातून आलेले मला आता नाव आठवत नाही,ते म्हणाले आम्ही सम्राट मधिल पुण्यानुमोदन कार्यक्रमाची बातमी वाचून आलो,तुम्ही बातमी देऊन बरं केलंत नाहीतर आम्हाला हा कार्यक्रम सुद्धा मिळाला नसता,अन आमच्या सहकाऱ्याला शेवटची कृतज्ञता व्यक्त करत अभिवादन करता आलं नसतं.
आजही वृत्तपत्र अन डिजिटल (इलेक्ट्रॉनिक) माध्यम हे चळवळीसाठी अत्यंत गरजेची गोष्टी आहे. माध्यम नसेल तर समाज आंधळा बहिरा होऊन जातो,त्यामुळे माध्यमे असली पाहिजेत वाढली पाहिजेत,नाहीतर गोदी मिडिया आपलं अस्तित्व चिरडून संपवून आपल्याला तिसऱ्या जगात जगायला मजबूर करू शकते.हे धोके लक्षात घेतले पाहिजेत.
टीम जागल्याभारत कडून संपादक बबन कांबळे यांना भावपूर्ण आदरांजली
वाचकांना आवाहन सम्राट बद्दल असणाऱ्या तुमच्या आठवणी आमच्यासोबत शेअर करा.
अदानी हिंडेनबर्ग अहवाल : व्यवहारात पारदर्शकता आवश्यक
संभाजी भिडे गडकोट मोहीम वादात,दुर्गंधी पसरली; कारवाईची मागणी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 08,2023 10:55 AM
WebTitle – Baban Kamble, editor of Dainik Samrat, passed away